Kanni Marathi Movie: हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला  

मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे.

0
Kanni Marathi Movie
Kanni Marathi Movie

नगर : मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर (Pre Teaser) सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत.

नक्की वाचा : शीना बोरा हत्याकांडावर डॉक्युमेंट्री सीरिज येणार 

‘कन्नी’ या चित्रपटात कोण झळकणार ?(Kanni Marathi Movie)

‘कन्नी’ या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत आहे. त्यात अजिंक्य राऊत देखील दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे केलं आहे. तर अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

अवश्य वाचा : मुनव्वर फारुकी झाला ‘बिग बॉस १७’चा विजेता

दिग्दर्शक समीर जोशी यांनी केले ‘कन्नी’ चे दिग्दर्शन (Kanni Marathi Movie)

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात,पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो आपणआपल्या कुटुंबासोबत, मित्र मैत्रिणींसोबत पाहू शकतो. सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ‘कन्नी हा चित्रपट ८ मार्चपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here