Dr. Amol Kolhe : सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या : डॉ. अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe

0
Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhe

Dr. Amol Kolhe : पाथर्डी : दिल्लीच्या इशाऱ्यावर हुजरेगिरी करणाऱ्यांना निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या. तुमच्या मनात प्रताप ढाकणे हे आमदार व्हावे अशी इच्छा असून ती पूर्ण होणार आहे. सध्या केवळ झेंड्याची भाषा वापरली जात असून पोटातल्या भुकेला जात व धर्म नसतो हे त्यांना कळेनासे झाले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी केली. राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे (Pratap dhakne) यांनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सुरु केलेल्या युवा संपर्क अभियानाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

हे देखील वाचा : गुन्हेगारांचे बळ वाढू नये, यासाठी पोलिसांना विशेष सूचना : राधाकृष्ण विखे पाटील

शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी (Dr. Amol Kolhe)

स्व. माधवराव निऱ्हाळी नाट्यगृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास अ‍ॅड. प्रताप ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, प्रभावती ढाकणे, शिवशंकर राजळे, भगवान दराडे, बंडू पाटील बोरुडे, सिद्धेश ढाकणे, गहिनीनाथ शिरसाट, वैभव दहिफळे, डॉ. दीपक देशमुख, चंद्रकांत भापकर, पांडुरंग शिरसाट, देवा पवार, योगेश रासने, सिताराम बोरुडे, माधव काटे, विष्णू ढाकणे, महारुद्र किर्तने, माउली केळगंद्रे, डॉ. राजेंद्र खेडकर, प्रकाश दहिफळे, वैभव दहिफळे, महादेव दहिफळे, योगिता राजळे, सविता भापकर, रत्नमाला उदमले, आरती निऱ्हाळी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची वाटचाल भविष्याची या पुस्तकाचे प्रकाशन खासदार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हे म्हणाले, शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करा, अशी मागणी आम्ही केली तर खासदार सुळे व माझ्यावर निलंबनाची कारवाई केली. अंधभक्तांच्या टोळीपासून आता आपल्याला वाचवायचे असल्याने नवमतदारांनी विचारपूर्वक मतदान करायला हवे.

नक्की वाचा: काँग्रेसकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही : प्रफुल्ल पटेल

राज्याच्या ताटातील प्रकल्प गुजरातला (Dr. Amol Kolhe)

Dr. Amol Kolhe

वंचितांसाठी आपले आयुष्य वेचण्याचे काम स्व. मुंडे यांनी केल्याने पाथर्डी तालुक्यात आलो की त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्व. ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणण्यासाठी  विधानसभेत पत्रके फेकली अन काळाच्या ओघात ते देशाचे ऊर्जामंत्री झाले, हा प्रवास प्रेरणादायी आहे. आपली अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर असल्याचे सांगितले जाते. मात्र, देशातील नव्वद टक्के संपत्ती ही दहा टक्के लोकांच्या हातात आहे. टाटाएअरबस, वेदांत सारखे राज्याच्या ताटातील प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. मात्र, या विषयावर सत्ताधारी खासदार बोलत नाही. कोट्यवधी रुपयांचे रस्ते, पूल, राम मंदिर उभारले याचा आम्हालाही अभिमान आहे. मात्र, माणूस सुद्धा जगला पाहिजे याचा विचार सरकार करत नसून जाती धर्माच्या नावाखाली जनतेला वेढण्याचे काम यांनी सुरु केले आहे.

अवश्य वाचा : नगर अर्बन घाेटाळाप्रकरणी अशाेक कटारिया यांना अटक; न्यायालयाने सुनावली सात दिवसांची काेठडी

विरोधात कोणी बोलले तर ईडी व सीडी चा वापर केला जातोय. मात्र, या सर्वाविरुद्ध ८३ वर्षाचे तरुण नेते शरद पवार लढत आहे. जो संघर्ष करतो आणि संघर्षात लढतो त्याचा इतिहास साक्षीदार राहतो. जिंकलेला व हरलेला यामध्ये एकच फरक असतो तो म्हणजे जिंकलेल्या व्यक्तीने हरलेल्या व्यक्ती पेक्षा एकदा जास्त प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे तो जिंकून विजयापर्यंत पोहोचतो, त्यामुळे तरुणांनी प्रयत्न करणे सोडू नका, विजय तुमचाच आहे, असा सल्ला शेवटी कोल्हे यांनी दिला. स्वागत ऋषिकेश ढाकणे यांनी केले. प्रस्ताविक अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी तर सूत्रसंचलन गणेश सरोदे, अपर्णा शेळगावकर यांनी केले. माधव काटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here