Sanjay Raut :साखर-डाळ वाटपावरून संजय राऊतांची टीका; भाजपकडून लाडू पाठवत प्रत्युत्तर

खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात वाटलेल्या साखर-डाळ वाटपावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला भाजपच्या पदाधिकार्‍याने अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे.

0
Sanjay Raut and Dhananjay Jadhav
Sanjay Raut and Dhananjay Jadhav

नगर : खासदार विखे (Sujay Vikhe) हे साखर आणि डाळ वाटून आता लोकांकडे मतं मागत आहेत आणि लोक त्यांना मत देत आहेत. हे थांबले पाहिजे, शिवसेनेने (Shivsena) हे थांबवले पाहिजे, असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी खासदार सुजय विखे यांच्या साखर-डाळ वाटपावर टीका केली होती. नगर येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.  

नक्की वाचा : महाराष्ट्रात गारठा वाढणार; ‘या’ तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम

भाजपचे धनंजय जाधव यांचे संजय राऊतांना उत्तर (Sanjay Raut )

संजय राऊत यांच्या या टीकेला भाजपच्या पदाधिकार्‍याने अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे. भाजपचे नगर शहर जिल्हाउपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी खासदार विखे आणि कुटुंबियांनी नगर जिल्ह्यात वाटलेल्या साखर-डाळीपासून तयार केलेला प्रसादाचा लाडू खासदार संजय राऊत यांना कुरिअर करून मुंबईच्या घराच्या पत्त्यावर पाठवला आहे. या  प्रसादाबरोबर जाधव यांनी एक पत्र देखील पाठवले आहे. यात खासदार राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले आहे.

अवश्य वाचा : हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला

‘यासाठी’ केले साखर-डाळीचे वाटप (Sanjay Raut )

यावेळी धनंजय जाधव म्हणाले की, सुजय विखे पाटील हे मतदार संघात साखर आणि डाळ वाटून मते मिळवत आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. हे एकदम खोटे आहे. सुजय विखे यांची प्रभू श्रीरामावर आस्था आहे. म्हणून त्यांनी अयोध्या राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी सामान्य नागरिकांना दिवाळी साजरी करता यावी, या हेतूने साखर आणि डाळ वाटली होती. सुजय विखे यांनी असे आवाहन केले होते की, घरोघरी आपण यापासून लाडू तयार करा. आणि त्याचा प्रसाद २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांना दाखवा.

संजय राऊत यांनी उगीचच राजकीय वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे मला असे वाटते की, त्यांनाही प्रभू श्रीरामांचा गेला पाहिजे. त्यांच्या पत्त्यावर मी त्यांना प्रसाद पाठवत आहे. प्रभू श्रीरामाकडे मी मागणी करत आहे की, संजय राऊत यांची शारीरिक प्रकृती आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावे. कुठे राजकारण करावे आणि कुठे करू नये हे त्यांना समजो, अशी प्रार्थना मी प्रभू श्रीराम चरणी करणार आहे. असं त्यांनी यावेळी सांगितले.

हेही पहा : राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here