Congress : नागवडे पती-पत्नीचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

Congress : नागवडे पती-पत्नीचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

0
Congress

Congress : श्रीगोंदा: काँग्रेस (Congress) जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार आहोत. तसेच अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा ना मिळो उमेदवारी करणार असल्याची घोषणा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी केली.

नक्की वाचा : अमित शाहांच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी निघणार : सुजय विखे पाटील

नागवडे समर्थकांची बैठक (Congress)

आगामी निवडणुका व राजकीय वाटचालीची दिशा ठरविणेबाबत नागवडे समर्थकांची बैठक श्रीगोंदा येथे बुधवारी (ता.७) घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे माजी संचालक जिजाराम खामकर होते. यावेळी बाळासाहेब नाहटा, बाबासाहेब भोस, राकेश पाचपुते, सुभाष शिंदे, रामदास झेंडे, मच्छिंद्र सुपेकर, शिवाजीराव पाचपुते, सतिष मखरे यांच्यासह नागवडे कारखान्याच्या संचालकांची उपस्थिती होती.

Congress

नक्की वाचा: काँग्रेसने ४० जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील’: नरेंद्र मोदी

अजित पवार देणार पाठबळ (Congress)

नागवडे म्हणाले, मागील दोन विधानसभा निवडणुकीत इतरांना मदत करत त्यांना आमदार होण्यास मदत केली. स्व. बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी मध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहत अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला. बापूंच्या आशीर्वादाने सत्ता असो अथवा नसो समाजकार्य सुरूच ठेवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला बोलावत, चर्चा करत, येणाऱ्या काळात पाठबळ देण्याची भूमिका घेतली. या प्रक्रियेत राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी महत्वाची भूमिका घेत भेट घडवून आणली. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याबाबत सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा अनुराधा नागवडे आणि माझा दोघांचाही आज राजीनामा पाठविला असल्याचे जाहीर करत येत्या २० तारखेच्या आत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा राजेंद्र नागवडे यांनी केली.नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, संचालक सुभाष शिंदे, सतीश मखरे, जिजाराम खामकर भीमराव नलगे, चांगदेव पाचपुते, रुपेश इथापे, यांच्यासह अनेक नागवडे समर्थकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमोद शिंदे, महेश जंगले, निवास नाईक, शहाजी गायकवाड, प्रकाश बोरुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Ajit Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here