Corruption : जोर्वे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा

Corruption : जोर्वे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा

0
Corruption : जोर्वे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा
Corruption : जोर्वे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा

Corruption : संगमनेर: मागील तीन वर्षापासून जोर्वे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली दिली गेली आहे. मात्र, या वस्तू गावात आलेल्या नाही, याचबरोबर अनागोंदी कारभार व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने समस्त गावकऱ्यांनी आज पंचायत समितीवर (Panchayat Samiti) घेराव आंदोलन करून या भ्रष्टाचाराची (Corruption) वाभाडे काढले. याचबरोबर पुढील एक महिन्यांमध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी

सर्व ग्रामस्थांनी आज पंचायत समितीला घेराव

जोर्वे मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्व ग्रामस्थांनी आज पंचायत समितीला घेराव घातला. यावेळी उपसरपंच बादशहा बोरकर, माणिक यादव ,सुरेश थोरात, आण्णासाहेब थोरात , हौशीराम दिघे किसन खैरे, दिगंबर इंगळे, संदीप काकड , मुकेश काकड, रावसाहेब दिघे , राजेंद्र थोरात,रावसाहेब नाना काकड, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर जोर्वेकर, सागर यादव,राजू बलसाने, संजय थोरात ,सुखदेव चव्हाण , पुंजाहरी दिघे, हरिभाऊ इंगळे ,सोपान कोल्हे, गोरख काकड, संतोष जाधव ,संपत थोरात, रावसाहेब लक्ष्मण काकड, शांताराम दिघे, जगन्नाथ दिघे, सुनिल दिघे,विठ्ठल काकड ,राजू शेख, राहुल बोरकर ,अनिल गायकवाड, रावसाहेब यादव, सागर भवर, भाऊसाहेब दिघे, प्रमोद इंगळे, डॉ. प्रवीण काकड, अक्षय दिघे, बंटी यादव, गणेश इंगळे, योगेश जोशी, वसंत बोरकर, संदीप काकड, संदीप इंगळे, अनिल थोरात, अमोल क्षीरसागर, विद्रोही संघटनेचे अध्यक्ष भास्कर बर्डे, सत्यजित थोरात, मीनाक्षी थोरात, मनीषा दिघे, संगीता थोरात, मंगल काकड, जयश्री दिघे, मंगल दिघे, लता बर्डे, ज्योती थोरात, अनिता काकड आदी उपस्थित होते.

Corruption : जोर्वे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा
Corruption : जोर्वे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा

अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सर्व ग्रामस्थांनी एकमुखी मागणी (Corruption)

यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी मागणी करत तातडीने झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची निपक्षपातीपणे चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राजकीय वरदस्त लाभलेल्या या मंडळींनी गोरगरिबांचे व आदिवासींचे पैसे लाटून मोठा भ्रष्टाचार केला आहे. आपल्या बगलबच्चाना हाताशी धरून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे . मागील वेळी ग्रामसभेमध्येही याबाबत नागरिकांनी आवाज उठवला, मात्र सत्ताधाऱ्यांनी सभेतूनच पळ काढला. या ग्रामसभेची जिल्हाभर चर्चाही झाली आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप करण्यात आला. येणाऱ्या महिन्यांमध्ये जर या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नाही तर पंचायत समितीसमोर संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल, असा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे. हे निवेदन गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी स्वीकारले.