Crime : नगर : अहिल्यानगर शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या आणि ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिकेने (AMC) कारवाईचा बडगा उगारला आहे. सावेडी येथील प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कंपाऊंडच्या भिंतीवर १ बीएचके, २ बीएचके भाड्याने मिळेल अशा आशयाचा विनापरवाना जाहिरात फलक लावल्याप्रकरणी एकावर तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!
शहराचे विद्रुपीकरण केल्याचा ठपका (Crime)
याप्रकरणी प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार (वय ५६, रा. बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. अतिक्रमण विभागाच्या पथकाला छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या लोखंडी ग्रीलवर २१ फुटाचा फ्लेक्स बोर्ड आढळला. त्यावर १ बीएचके, २ बीएचके भाड्याने मिळेल असे लिहून मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हा फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत. पथकाने तत्काळ पंचनामा करून, विनापरवाना बोर्ड हस्तगत करून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड



