Ikkis Actress Simar Bhatia:’इक्कीस’ चित्रपटात झळकणाऱ्या सिमरने वेधलं बॉलिवूडचं लक्ष

0
Ikkis Actress Simar Bhatia:'इक्कीस' चित्रपटात झळकणाऱ्या सिमरने वेधलं बॉलिवूडचं लक्ष
Ikkis Actress Simar Bhatia:'इक्कीस' चित्रपटात झळकणाऱ्या सिमरने वेधलं बॉलिवूडचं लक्ष

Ikkis Actress Simar Bhatia: ‘इक्कीस’ (Ikkis Movie) या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. ती यातील नवीन अभिनेत्रीच्या चेहऱ्यामुळे. अभिनेता अगस्त्य नंदा हा ‘इक्कीस’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. मात्र या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत सिमर भाटिया (Simar Bhatia) झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Trailer Release) झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिमरविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सिमर ‘इक्कीस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. ती अभिनेता अक्षय कुमारच्या कुटुंबातील आहे.

नक्की वाचा:  भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!  

सिमर भाटिया कोण आहे? (Ikkis Actress Simar Bhatia)

सिमर भाटिया ही अक्षय कुमारची बहीण अलका भाटियाची मुलगी आहे. म्हणजेच सिमर ही अक्षयची भाची आहे. अक्षयने अनेक वेळा आपल्या भाचीच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे. अलीकडेच ‘इक्कीस’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रेलर शेअर करत सिमरसाठी एक गोड संदेशही लिहिला आहे. त्याने लिहिलंय की, “माझी लहान सिमी आता लहान राहिली नाही. तुझ्या लिव्हिंग रूम परफॉर्मन्सपासून ते #Ikkis या मोठ्या पडद्यापर्यंत, मन अभिमानाने भरून आलं.

अवश्य वाचा: नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला   

चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका  (Ikkis Actress Simar Bhatia)

या चित्रपटात सिमर ही अरुण खेत्रपालच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिनेश विजान यांनी मॅडॉक फिल्म्सच्या माध्यमातून याची निर्मिती केली आहे.