Crime News : श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव (Kolgaon) येथील ऋषिकेश देविदास लगड यांच्या पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली ८४ हजार रुपये किमतीची १२ क्विंटल पांढरी तुर (White Tur) २८ डिसेंबर रोजी चोरांनी चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात (Belwandi Police Station) गुन्हा दाखल होताच अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे (Ahmednagar Local Crime Branch) पोलिस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या टीमने याबाबत सखोल तपास केला. यावेळी अवघ्या तीन दिवसात सात आरोपींना जेरबंद (Imprisoned) करत ९ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नक्की वाचा : खाशाबा जाधवांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’म्हणून साजरा होणार
या प्रकरणी वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी (वय २७ वर्षे), अमोल संतोष माळी (वय २४ वर्षे),आकाश अजिनाथ गोलवड, (वय २५ वर्षे), विकास विठ्ठल घावटे (वय २० वर्षे), संदीप उत्तम गोरे (वय 32, वर्षे) सर्व (रा. जामगाव ता. पारनेर), रोहीत सुनिल शेळके (वय 19 वर्षे, रा. लोणी हवेली, ता. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोघे जण फरार झाले आहेत.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जानेवारीत राज्यव्यापी आंदाेलन
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ऋषिकेश लगड यांच्या घराचा दरवाजा बाहेरुन लावत घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली ८४ हजार रुपये किमतीची १२ क्विंटल पांढरी तुर २८ डिसेंबर रोजी चोरुन नेली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या टीमने याबाबत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्री करीता येणारे संशयीत इसमांची माहिती घेतली.
पोलिस निरीक्षक आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत (ता. १) हा गुन्हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी (रा. जामगांव, ता. पारनेर) याने त्याचे साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे माहित झाले. तसेच चोरी केलेली तुर व सोयाबीन चार चाकी गाडीमधुन विक्रीकरीता पारनेर येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकास खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
पोलीस पथकाने जामगांव ते पारनेर रस्त्यावर जामगांव घाट या ठिकाणी सापळा लावून चार चाकी वाहनामध्ये असलेल्या मालाची पाहणी केली. यामध्ये तुर व सोयाबीन असल्याचे पथकास आढळुन आले. त्यावेळी गाडीमधील इसमांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडील मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी गाडीमधील तुर व सोयाबीन असे चोरी करुन आणले असल्याचे सांगितले. या प्रकरणी वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल माळी, आकाश गोलवड, विकास घावटे, संदीप गोरे, रोहीत शेळके यांना अटक केली. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी किरण बर्डे, साहील माळी यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपींकडून ९६ हजार रुपये किमतीची १२ क्विंटल पांढरी तुर, ३० हजार रुपये किमतीची ६ क्विंटल सोयाबीन तसेच ८ लाख रुपये किमतीची चार चाकी वाहन असा एकुण ९ लाख २६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, मेघराज कोल्हे यांनी केली.