Mahavitaran : महावितरणची नव्या वर्षाची भेट; नवीन वीजजोडणी तातडीने उपलब्ध होणार

Mahavitaran : नगर : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी देण्याचे काम महावितरणकडून (Mahavitaran) करण्यात येत आहे.

0
Mahavitaran
Mahavitaran : महावितरण : नवीन वीजजोडणी तातडीने उपलब्ध होणार

Mahavitaran : नगर : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी देण्याचे काम महावितरणकडून (Mahavitaran) करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना (Electricity consumers) तातडीने नवीन वीजजोडणी (Power connection) उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा, असे सक्त निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : अहमदगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी रंगणार आठ शहरांत

पायाभूत वीजयंत्रणेची कामे करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. क्षेत्रीय कार्यालयांनी वीजखांब, वितरण रोहित्र, स्विच गिअर्स, वीजवाहिन्यांसह आवश्यक साधनसामग्री आपापल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध ठेवावी. ग्राहकांना तातडीने नवीन वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा योजनेमध्ये अर्जदार ग्राहक स्वतःच्या खर्चाने परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे व देखरेखीखाली आवश्यक पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याचे काम करतात. या खर्चाचा परतावा संबंधित वैयक्तिक अर्जदाराला किंवा ग्राहकांच्या गटाला मासिक वीजबिलांमध्ये समायोजित केला जातो.

नक्की वाचा : शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here