Criminal : गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले

Criminal : गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले 

0
Criminal

Criminal : राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील गुन्हेगारी (Criminal) प्रवृत्ती व अवैध व्यवसाय (Illegal business), महिला व तरुणींची होणारी छेडछाड, व्यापाऱ्यांवर होणारी दडपशाही, खासगी सावकरकीचा नंगानाच याचा बिमोड करण्यासाठी देवळाली प्रवरा सोसायटीच्या शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे सर्वपक्षीय बैठक (Meeting) पार पडली. या बैठकीस सर्व जाती धर्मातील मंडळी व विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा: साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

सर्व पक्षीय नेते तसेच व्यापारी व नागरिकांची बैठक (Criminal)


गेल्या अनेक वर्षांपासून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात मटका, जुगार, अवैध दारू विक्री जोमात सुरू असून महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्याने घडत आहे. तसेच खासगी सावकरकीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून काहींना खासगी सावकारकीला वैतागून देवळाली प्रवरा शहर सोडून जावे लागले. त्यामुळे  शहरातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व पक्षीय नेते-कार्यकर्ते तसेच व्यापारी व शहरातील नागरिकांची बैठक पार पडली.

नक्की वाचा: कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

सर्वपक्षीय व सर्वधर्मीय समिती स्थापन करणार (Criminal)

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय समिती स्थापन करण्याबाबत अनेकांनी भूमिका मांडल्या. तसेच अवैध व्यवसाय, महिला-तरुणींची छेडछाड, खासगी सावकारकी विरोधात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्याबाबत निर्णय झाला.

अवश्य वाचा : नगर अर्बन घाेटाळाप्रकरणी अशाेक कटारिया यांना अटक; न्यायालयाने सुनावली सात दिवसांची काेठडी

यावेळी व्यासपीठावर सीताराम ढुस, केरू पठारे, धोंडीभाऊ मुसमाडे, अण्णासाहेब चोथे, अशोक खुरूद, शिवाजी मुसमाडे, कांता कदम, बाबा देशमुख, सीताराम ढुस, सोपान शेटे, सोपान भांड, जगन्नाथ येवले, सोपान मुसमाडे, भगवान गडाख उपस्थित होते. यावेळी, सत्यजित कदम, सतीश वाळुंज, प्रकाश संसारे, नानासाहेब पठारे, रफिक शेख, नानासाहेब कदम, संतोष चोळके, शिवाजी मुसमाडे, संदीप खुरुद,नितीन पुंड, साईनाथ बर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here