Dance Plus Season 7 : ‘डान्स प्लस’ चा सातवा सीजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्लस वाहिनीवरील (Star Plus) ‘रिअॅलिटी शो’ डान्स प्लस’चा सातवा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर उपलब्ध असणार आहे.

0
‘डान्स प्लस’ चा सातवा सीजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dance Plus : नगर : देशात सर्वाधिक वाखाणल्या गेलेल्या स्टार प्लस वाहिनीवरील (Star Plus) ‘रिअॅलिटी शो’ पैकी एक म्हणजे ‘डान्स प्लस’ (Dance Plus). आता, हा दर्जेदार रिअॅलिटी शोचा सातवा सीजन (Season 7) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नृत्याचे अनोखे आविष्कार सादर करणाऱ्या आणि प्रेक्षकांना सहभागी करून घेण्याची उत्तम शैली असलेल्या या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक पुन्हा सज्ज झाले आहे.

नक्की वाचा : अकोलेतील उपोषण सुटले

रेमो डिसूझा, शक्ती मोहन, पुनित पाठक व राहुल शेट्टी यांसह इतर कॅप्टन्सच्या सौहार्दपूर्ण संबंधांमुळे,‘डान्स प्लस’ हा रिअॅलिटी शो आता प्रेक्षकांना दूरचित्रवाणी संचावर खिळवून ठेवण्यास सज्ज आहे. या वर्षी ‘डान्स प्लस’च्या नव्या सीझनमधून भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारातील अस्सल बारकावे प्रेक्षकांपुढे सादर होतील. नवीन ‘प्रोमो’सह सुरू होणाऱ्या नव्या सीझनमध्ये, मायकेल जॅक्सनला अनोखी श्रद्धांजली अर्पण करून, स्थानिक तसेच भारतीय संस्कृतीशी सुसंगतता आणण्याचे अनोखे उद्दिष्ट ‘डान्स प्लस’ रिअॅलिटी शोने बाळगले आहे.

हेही वाचा : ‘छगन भुजबळ पनवती’; मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका   

‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले रोमांचकारी, थरारक नृत्याविष्कार आपल्याला बघता येणार आहे. १६ डिसेंबरपासून ‘स्टार प्लस’वर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. हा कार्यक्रम ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर उपलब्ध असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here