National Highway : राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

पाथर्डी शहरातून जाणारा कल्याण - निर्मल ( विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गावरून वेगाने वाहने जात असल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

0
राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

पाथर्डी : शहरातून जाणारा कल्याण – निर्मल (विशाखापट्टणम) (Kalyan-Nirmal National Highway) या राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी शहराचे ग्रामदैवत दक्षिण मुखी पोळा मारुती मंदिर आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गावरून अत्यंत भरधाव वेगाने वाहने जात असल्याने अपघातांमध्ये वाढ (Increase in accidents) झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे व जगदीश गाडे यांनी केली आहे. येत्या पंधरा दिवसात गतिरोधक न बसवल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या पाथर्डी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन (Strike) करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘छगन भुजबळ पनवती’; मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका   

अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते. मागील चार ते पाच महिन्यापूर्वी हे काम पूर्ण झाल्यापासून या महामार्गावरून अत्यंत भरधाव वेगात वाहने धावतात. या दक्षिण मुखी पोळा  मारुती मंदिराजवळ एकूण चार रस्ते एकत्र होतात. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन प्रवाशांना गंभीर दुखापती झालेल्या आहेत. चांदगाव, कोरडगाव, पाथर्डी शहराकडून येणार रस्ता, खोलेश्वर मंदिराकडून येणारा रस्ता तसेच कसबा पेठेतून येणारा रस्ता या मार्गावरून येणारी वाहने मारुती मंदिर परिसरात समोरासमोर येतात. त्यामुळे अपघाताची परिस्थिती ओढवत आहे.

हेही वाचा : महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘पिंक रिक्षा योजना’

याबाबत माहिती देताना बोरुडे म्हणाले, रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नांदेड, परभणी, बीड, माजलगाव,गेवराई, हिंगोली, श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेत्र मोहटादेवीला येणारे भाविक आणि प्रवासी मोठ्या स्वरूपात या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करत आहे. मुंबई, पुणे, कल्याणकडे जाणाऱ्या खाजगी आराम बस मोठ्या वेगाने धावत आहे. मंदिरापासून शंभर फुटांच्या अंतरावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अमरधाम आहे. मात्र याठिकाणी वाहनचालकांकडून गर्दीकडे दुर्लक्षित करून एका बाजूने वाहने नेण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे इथे राहणाऱ्या रहिवाशांच्या लहान मुलांसह नागरिकांचा जीव या रस्त्याने भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहतुकीमुळे टांगणीला लागला आहे. त्यामुळे हे निवेदन देण्यात आलं आहे . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here