Death : शेवगाव : चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवकाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. गुरुवारी (ता.२) सकाळी आठ वाजल्यापासून हा तरुण बेपत्ता (Missing) होता. शुक्रवारी (ता.३) दुपारी एक वाजेच्या दरम्यान संबंधित तरुणाचा मृतदेह (Dead Body) कालव्याच्या पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या
चार दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे (वय २५) या युवकाचा चार दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. २ मे रोजी त्याचा सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम असताना, नागेश सकाळी आठ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. त्याचा फोन देखील बंद असल्याने ग्रामस्थांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. सकाळी साडेनऊच्या दरम्यान त्याची मोटारसायकल हातगाव-पिंगेवाडीच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या बाजूला लावलेली आढळून आली. काल दिवसभर कालव्याच्या पाण्यात त्याचा शोध घेण्यात आला. मित्र – नातेवाईक यांना फोन करून चौकशी करण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना दुपारी एकच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात, चारी नंबर नऊच्या गेटजवळ नागेशचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
अकस्मात मृत्यूची नोंद (Death)
शेवगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे साहेब यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. मृतदेह कालव्यातून काढून उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नागेश वर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.