Hamida Banu: हमीदा बानोंसाठी गुगलने बनवले खास डुडल!

गुगलने ४ मे २०२४ रोजी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांना समर्पित करत डूडल तयार केले आहे.

0
Hamida Banu
Hamida Banu

नगर : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्यात भारतात महिला कुस्तीपटूंचे (Female Wrestlers) वर्चस्व आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, राष्ट्रकुल चॅम्पियन विनेश फोगट, आनंद पंघाल यांसारख्या मोठ्या नावांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. यातील एक महत्वाचे नाव म्हणजे हमीदा बानो. गुगलने आज हमिदा बानो यांना डुडलच्या (Doodle) माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

नक्की वाचा : मुंबईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात; मुंबईचा KKR कडून पराभव

कोण आहेत हमीदा बानो ?(Hamida Banu)

काही वर्षांपूर्वी  कुस्ती फक्त पुरुषांचा खेळ मानला जात होता. महिला कुस्ती करतील याचा विचार देखील कोणी केला नव्हता. त्यावेळी उत्तर प्रदेशमधील हमीदा बानो देशातील पहिली महिला कुस्तीपटू बनली. गुगलने ४ मे २०२४ रोजी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांना समर्पित करत डूडल तयार केले आहे. हमीदा बानो १९४०-४५ च्या दशकातील देशातील सर्वात लोकप्रिय कुस्तीपटू होत्या. देशातील अनेक बड्या कुस्तीपटूंना पराभूत करणारी ती देशातील पहिली महिला कुस्तीपटू होती. हमीदा बानोने कुस्तीच्या सामन्यात ‘जो कोणी तिला पराभूत करेल त्याच्याशी लग्न करेल’, अशी अट घातली होती.

अवश्य वाचा : जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या 

हमीदा बानोचा २००६ मध्ये लाहोरमध्ये मृत्यू  (Hamida Banu)

जेव्हा जेव्हा हमीदा बानो कुस्तीच्या मैदानात उतरायची तेव्हा तिला पाहून विरोधक घाबरायचे. हमिदा बानो यांची उंची ५ फूट ३ इंच आणि वजन १०८ किलो होते. तिच्या रोजच्या आहारात पाच-सहा लिटर दूध, दोन-आठ लिटर सूप, एक-आठ लिटर फळांचा रस, एक किलो चिकन, एक किलो मटण, एक किलो बदाम, अर्धा किलो तूप, सहा अंडी आणि दोन प्लेट बिर्याणी यांचा समावेश होता. भारतातील यशानंतर हमीदा बानो ने युरोपात जाऊन लढायचे ठरवले. इथून त्याच्या करिअरचा ग्राफ खाली घसरू लागला. त्यानंतर बानो कुस्तीच्या दुनियेतून अचानक गायब झाली. हमीदा बानोने २००६ मध्ये लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here