Delivery Boy Teaser Out:’डिलिव्हरी बॉय’चा टीझर रिलीज;धम्माल कॉमेडी पहाच !

अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप यांचा 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

0
Delivery Boy

नगर : अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) यांचा डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज (Teaser Out) झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

नक्की वाचा : साईबाबांच्या चरणी भक्तांकडून भरभरुन देणगी; अकरा दिवसांत १६ कोटींचं दान

‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला प्रथमेश आणि पृथ्वी हे दोघे गावातील एका घराच्या बाहेर जाऊन बसताना दिसत आहेत. त्यानंतर प्रथमेश एका माणासाला सांगतो, “मी वहिनींसाठी एक स्पेशल काम आणलं आहे. ज्या बायांना मुलं होत नाहीत, अशा बायांची मुलं वहिनींच्या पोटात वाढवायचं” प्रथमेश हा सरोगसीबद्दल बोलतं. त्याचं बोलणं ऐकून गावातील लोक आश्चर्यचकित होतात. काही लोक पृथ्वी आणि प्रथमेशला मारायला लागतात, असं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

अवश्य वाचा : जिल्हा प्रशासन मिशन माेडवर; मराठा सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात वीस हजार कर्मचाऱ्यांची हाेणार नियुक्ती

‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचा टीझर प्रथमेशनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला त्यानं कॅप्शन दिलं आहे, “दोन अतरंगी मित्र आणि एक हुशार डॉक्टर, तिघे मिळून करायला येतायत कॉमेडी आणि एंटरटेनमेंटची डिलिव्हरी! सादर आहे ९ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’ चा हा धम्माल टीझर!”

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अंकिता लांडे पाटील, प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आता त्याच्या ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here