Dhangar : धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; मंत्री विखे पाटील

Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil informed that the government is positive about the demands of Dhangar community.

0
246

नगर : धनगर (Dhangar) समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन (Government) सकारात्मक आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच यांच्या शिष्टमंडळाने वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटलांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या संचालिका पल्लवी लांडे आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here