Digital media : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0
Digital media : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
Digital media : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Digital media : नगर : डिजिटल मीडिया (Digital media) संपादक(editor), पत्रकार (Journalists) संघटनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.

नक्की वाचा : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली

शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक, पत्रकारांची बैठक झाली. यावेळी ज्येेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, बाबा जाधव, मकरंद घोडके, इकबाल शेख, विजय सांगळे, जितेंद्र गांधी, दैनिक स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मनोज सातपुते, लेटस्अपचे प्रवीण सुरवसे, अमोल भिंगारदिवे, श्रीकांत खांदवे, सागर गोरखे, प्रशांत शिंदे, नगर घडामोडीचे सागर तनपुरे, विक्रम लोखंडे, ग्लोबल न्यूजचे गिरीश रासकर, सोनाली गांधी, आय लव्ह नगरचे प्रेम कांबळे, एनटीव्हीचे शब्बीर सय्यद, दिव्य मराठीचे उदय जोशी, सरकारनामाचे गणेश ठोंबरे, प्रियंका शेळके-बोबडे, शुभम पाचारणे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : बस पुलावरून कोसळली; प्रवासी थोडक्यात बचावले

जाहीर कार्यकारिणी
जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर (राहुरी), कार्याध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे (नेवासा), उपाध्यक्ष मेट्रो वाहिनीचे संपादक मकरंद घोडके (खजिनदार), लियाकत शेख (जामखेड), आकर्षणचे संपादक विजय सांगळे (नगर), सहसचिव अहमदनगर लाईव्हचे तेजस शेलार (नगर), कार्यकारिणी सदस्य एन टीव्हीचे संपादक इकबाल शेख (अहमदनगर), दैनिक सार्वभौमचे संपादक सागर शिंदे (अकोले), विजयमार्गचे संपादक अतुल लहारे (अकोले), सय्यद अन्सार (नगर). नगर शहराध्यक्ष लोकशाही टीव्हीचे प्रतिनिधी संतोष आवारे, उपाध्यक्षपदी प्रियंका शेळके-बोबडे, शुभम पाचारणे, सौरभ गायकवाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here