काेड रेड
Diverted traffic : नगर : दाैंड रस्त्यावर नगर-बीड रेल्वे लाईनवर ओलांडणी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर वाहतूक हाेत असल्याने अपघात हाेऊन कायदा-सुव्यवस्थेचा (Law and order) प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल (Diverted traffic) करण्यात आला आहे, असा आदेश पाेलीस अधीक्षक (Police Superintendent) राकेश ओला यांनी जारी केला आहे. हा आदेश १४ ते २१ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे.
हे देखील वाचा: पारगाव येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात जबरी चोरी
सर्व प्रकारची वाहतूक बंद (Diverted traffic)
या आदेशानुसार नगर-दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रस्त्यावरी येणारी- जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नक्की वाचा: आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंदची हाक
पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन (Diverted traffic)
असा असणार बदल
कायनेटीक चौकातून दाैंड रस्त्याने अरणगाव बायपासकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग कायनेटीक चौक- केडगाव-केडगाव बायपास-अरणगाव बायपास मार्गी जाता येईल.
अरणगाव चौकातून कायनेटीक चौकाकडे येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग अरणगाव बायपास- केडगाव बायपास- केडगाव- कायनेटीक चौक मार्गे जाता येणार आहे. पुण्याकडून दाैंड रस्त्याला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग केडगाव बायपास-अरणगाव बायपास मार्गाने दाैंड रस्त्याने जाता येणार आहे.