EVM : …अन्यथा ‘ईव्हीएम’ फोडण्याचा ‘रिपाइं’चा इशारा

EVM : …अन्यथा 'ईव्हीएम' फोडण्याचा 'रिपाइं'चा इशारा

0
RPI

EVM : नगर : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) बॅलेट पेपरवर घ्याव्या, अन्यथा ईव्हीएम (EVM) मशिन फोडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (RPI) (गवई) वतीने करण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

हे देखील वाचा: पारगाव येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात जबरी चोरी

यांची उपस्थिती (EVM)

 यावेळी रिपाइंंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, युवक शहराध्यक्ष अमोल खरात, शहर जिल्हा सचिव विनीत पाडळे, अल्पसंख्याक आघाडीचे नईम शेख, अजीम खान, आफताब बागवान, प्रकाश भटेजा, जावेद सय्यद, आदिल शेख, हुसेन चौधरी, चिकू गायकवाड आदी उपस्थित हाेते.

EVM

नक्की वाचा: काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

ईव्हीएमवर जनतेचा विश्‍वास नसल्याचा दावा (EVM)

 आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिकाच्या सर्व निवडणुका ईव्हीएमवर होणार आहे. ईव्हीएमवर जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. ईव्हीएम हॅक होण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. तरी देखील सर्वच निवडणुका ईव्हीएमवरच घेतल्या जात आहे. त्यामुळे एकच पक्ष सातत्याने सत्तेत येत आहे. ही बाब भारतीय लोकशाहीला घातक आहे. यामुळे देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठयांची केवळ १ टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नाही. दोन्हींची शंभर टक्के तुलना होणे आवश्‍यक आहे. निवडणुकांच्या काळात झालेल्या घोटाळ्यामुळे ईव्हीएमवरील जनतेचा विश्‍वास संपत चालला आहे. देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएमवर अविश्‍वास दाखवलेला आहे. विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोग संवेदनशीलता दाखवून दखल घेत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणात निवडणूक आयोग देखील सत्ताधाऱ्यांना साथ देत आहे. या घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे वळाली असल्याचा आरोप रिपाइंच्या वतीने करण्यात आला आहे. तर ईव्हीएमवर बंदी घालून आगामी लोकसभा निवडणुका सर्व बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here