Diwali : किराणा किट वाटपातून दिव्यागांची आनंदी दिवाळी

आर्थिक दुर्बल दिव्यांग यांना यंदा दिवाळी किराणा किट दिल्याने एक तरी दीप लावू, अंधारलेल्या जगी या उक्तीस संस्था व संस्थेला मदत देणारे देणगीदार प्रकाश दाते ठरले आहेत, असे प्रतिपादन ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्यामल भोसले यांनी केले. 

0

नगर : समाजातील बेरोजगार, आर्थिक दुर्बल दिव्यांग (disabled) समाज घटकाचे प्रश्न अत्यंत बिकट आहेत. समाजात अनामप्रेम (Anamprem) संस्थेच्या माध्यमातून नगर, पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनामप्रेमने ३० ते ६० वयोगटातील बेरोजगार, आर्थिक दुर्बल दिव्यांग यांना यंदा दिवाळी (Diwali) किराणा किट दिल्याने एक तरी दीप लावू, अंधारलेल्या जगी या उक्तीस संस्था व संस्थेला मदत देणारे देणगीदार प्रकाश दाते ठरले आहेत, असे प्रतिपादन ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्यामल भोसले यांनी केले. 

नक्की पहा : आरक्षणावरून मनोज जरांगेंनी केलं सर्वात मोठं विधान 


अनामप्रेम संस्थेतर्फे प्रमुख प्रायोजक आय लव नगर व शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन आयोजित दिव्यांगांची आनंदी दिवाळी २०२३ कार्यक्रमात भोसले बोलत होत्या. भोसले म्हणाल्या की, समाजात जे दिव्यांग बेरोजगार आहेत,आर्थिक दुर्बल आहेत त्यांचे जगणे आव्हानात्मक आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.

हेही पहा:  नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचा ‘ओले आले’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार 

यंदाच्या दिवाळीत नोंदणीकृत बेरोजगार,आर्थिक दुर्बल दिव्यांग यांना अनामप्रेम संस्थेने ४००  यांना किराणा किट दिवाळी भेट म्हणून दिले. शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, आय लव नगर, इनर व्हील क्लब बॉम्बे बे व्हीव मुंबई, प्रयास फाउंडेशन वाशी,नवी मुंबई यांच्या माध्यमातून किराणा किट वाटप कार्यक्रम नोबल हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नोबल हॉस्पिटल चे संस्थापक संचालक डॉ.बापूसाहेब कांडेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख, कामथ असोसिएटचे नंदन कामथ, आर्किटेक्ट श्रद्धा अंदुरे, युवा नेत्या संध्या सोनवणे, इंजि.आदिनाथ दहिफळे, विजय भोसले, अनामप्रेम विश्वस्त उद्योजक अविनाश बोपर्डीकर, निवृत्त सनदी अधिकारी नितीन थाडे, सी.ए.अशोक पितळे, आय.आय.आय.डी. चे अध्यक्ष अजय अपूर्वा, चित्रकार सुजाता पायमोडे,  अनामप्रेम अध्यक्ष इंजि.अजित माने, सचिव डॉ.मेघना मराठे, संस्थेचे जे.आर.मंत्री, अभय रायकवाड, विष्णू वारकरी, विक्रम प्रभू,  नोबल हॉस्पिटलचे विजय निकम, राहुल हिरे आदी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली तर समारोप अनामप्रेमच्या  प्रकाशगान संगीत मंचच्या दिव्यांग कलाकार यांनी गायलेल्या ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या प्रेरणा गीताने झाला. नगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून बेरोजगार,आर्थिक दुर्बल दिव्यांग ४०० पेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात दिव्यांग यांना मार्गदर्शन करताना डॉ.बापूसाहेब कांडेकर यांनी संस्थेचे विविध उपक्रम व बेरोजगार, दुर्बल दिव्यांग यांच्या पुनर्वसनाचे विविध मार्ग विशद केले. इंजि.अजित माने यांनी संस्थेचे विविध प्रकल्पाची विस्ताराने माहिती उपस्थितांना देत संस्था कामास भेट देण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कुलकर्णी यांनी केले. उमेश पंडुरे यांनी आभार मानले. अनामप्रेमच्या सर्व दिव्यांग कार्यकर्ते यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.