Nana Patekar : नाना पाटेकरांच्या ‘जर्नी’च्या शूटिंगला सुरुवात

नाना पाटेकरांचा 'जर्नी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

0
201

नगर : ‘गदर 2′(Gadar 2) च्या यशानंतर या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नानांनी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

नक्की पहा : नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचा ‘ओले आले’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

नाना पाटेकरांचा ‘जर्नी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नानांसह, उत्कर्ष शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

मुलगा आणि वडिलांच्या नात्यावर जर्नी या सिनेमाचं कथानक आधारित आहे. नानांच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘जर्नी’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.