Monika Rajale : पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची आमदार राजळेंची मागणी 

शेवगांव व पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे

0
208

पाथर्डी : शेवगांव व पाथर्डी तालुका दुष्काळी (Drought) जाहीर करण्याची मागणी आमदार मोनिका राजळे(Monika Rajale) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. हे निवेदन देताना आमदार मोनिका राजळे, शेवगाव पाथर्डीचे भाजपचे विधानसभा प्रमुख नारायण पालवे उपस्थित होते.

नक्की पहा : आरक्षणावरून मनोज जरांगेंनी केलं सर्वात मोठं विधान 

आमदार राजळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रातील इतर दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्याप्रमाणेच पाथर्डी व शेवगांव तालुका दुष्काळी जाहीर होणे अत्यंत गरजेचे आहे.पुरेसा पाऊस न झाल्याने अहमदनगर जिल्हयातच दुष्काळी परिस्थिती आहे.विशेषत: पाथर्डी व शेवगांव तालुक्यामध्ये अत्यंत अल्प पाऊस झालेला आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील खरीपाची पिके वाया गेली असून रब्बी हंगामाच्या पेरण्याही होवू शकल्या नाही.

हेही पहा:  नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचा ‘ओले आले’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार 

दुष्काळी परिस्थितीच्या निकषात बसत असूनही संबंधीत कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळी उपाययोजनापासून वंचीत राहण्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. या तालुक्यातील सर्व बंधारे, पाझर तलाव, के.टी वेअर बंधारे, विहीरी कोरडया पडत आहेत. त्यामुळे शासकीय धोरणात्मक निकषांची, केंद्र शासन संहीता, निर्देशांक कृषी व महसूल विभागाचे सत्यापण पाहणी, या सर्व बाबींचा फेरविचार होवून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करण्यात यावी.  

जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यमानाची तुट उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष व वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती, या सर्व घटकांचा अभ्यास करावा व कृषी, महसूल व मदत पुर्नवसन विभागाने या संदर्भात बैठक घेवून, पाथर्डी व शेवगांव तालुके दुष्काळी जाहीर करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.