Dr. Babasaheb Ambedkar : भीम सैनिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dr. Babasaheb Ambedkar

0
Dr. Babasaheb Ambedkar : भीम सैनिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Dr. Babasaheb Ambedkar : भीम सैनिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dr. Babasaheb Ambedkar : नगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या १५ दिवसाच्या आत करण्याच्या मागणीसाठी समस्त भीम सैनिकांच्या (Bhim Sainik) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector Office) मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी प्रतीक बारसे समवेत सुशांत म्हस्के, निलेश गायकवाड, दया गजभिये, शैनेश्वर पवार, अनिकेत केदारे, निखिल सूर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, ज्योती पवार, सारिका गांगुर्डे, सारिका साळवे, संपदा म्हस्के, संदीप वाघमारे, सनी भिंगारदिवे, प्रशांत कदम, विकी भिंगारदिवे, अण्णासाहेब गायकवाड, योगेश गायकवाड, संतोष जाधव विशाल गायकवाड आदीसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई

गुन्हा दाखल करण्याची मागणी (Dr. Babasaheb Ambedkar)

गेल्या ३ ते ४ महिन्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा झाकून ठेवलेला आहे. १० एप्रिल २०२५ रोजी महापालिका प्रशासनाने पुतळ्याचे अनावरण करण्याचे निश्चित केले होते. मात्र, अचानक ठरलेला कार्यक्रम रद्द केला. पुतळा झाकून महापालिका प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान व विटंबना केलेली असून आयुक्त यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.