Dunki Release : शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित ; चाहत्यांचा जल्लोष 

Dunki Release : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'डंकी' आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. डंकी चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

0
शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट प्रदर्शित

नगर : . बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘डंकी’ (Dunki) आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. डंकी चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नक्की वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठींच्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाच्या कथाकार आणि दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. या चित्रपटात शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ पेक्षा वेगळा दिसत आहे. शाहरुखसोबत या चित्रपटात तापसी पन्नू,(Tapsee Pannu) बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांनी  प्रमुख भूमिका साकारली आहे.

अवश्य वाचा : मधुमेही रुग्णांना आता स्वदेशी इन्सुलिन मिळणार

या चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, पंजाबमधील एका गावात राहणाऱ्या काही मित्रांना लंडनला जायचे आहे. तिथे गेल्याने आपली गरिबी संपेल असे त्यांना वाटत असते. त्यापैकी एकाला त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडला घेण्यासाठी लंडनला जायचे असते, मात्र लंडला जाण्यासाठी ते इंग्रजी शिकू शकत नाहीत. मग ते  डंकी फ्लाइट म्हणजे बेकायदेशीरपणे लंडनमध्ये जातात. असा सगळं अप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रस्तुत ‘डंकी’ची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानने अप्रतिम काम केले आहे. उर्वरित पात्रांनाही पूर्ण संधी देण्यात आली आहे. ढोल-ताशांचे वादन आणि फटाक्यांच्या आतषबाजी करत डंकी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो प्रेक्षकांनी साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here