ED : आता ईडी आणि तपास यंत्रणांची लुडबूड थांबवा; शिंदे गटाचा नेता संतापला

ED : आता ईडी आणि तपास यंत्रणांची लुडबूड थांबवा; शिंदे गटाचा नेता संतापला

0
Gajanan-Kirtikar
Gajanan-Kirtikar

ED : नगर : आता ईडी (ED) आणि तपास यंत्रणांची लुडबूड थांबवा, त्यामुळं लाेकांमध्ये चीड निर्माण झाली आहे, असं म्हणत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी भाजप सरकारवर संताप व्यक्त केला आहे. 

अवश्य वाचा : मूठभर लोकांनी स्वत:च्या फायद्याकरिता काँग्रेस पक्ष गहाण ठेवला; मंत्री विखे पाटलांचा गंभीर आराेप

महायुतीच्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार असून ते मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल, त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत गजानन किर्तीकर यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. पण काल मात्र एका प्रचारसभेत त्यांनी, त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतही केला.

हे देखील वाचा: भगवान महावीर जयंती मिरवणुकीत सर्वांनी शिस्त पाळावी : आदर्श ऋषीजी म.सा.

किर्तीकर म्हणाले (ED)

आता उत्तर पश्चिमचा खासदार आहे. निवडणूक लढत नाही. हे जाहीर केलं आहे. उबाठा गटाचा उमेदवार अमोल कीर्तिकर आहे सर्वांना माहिती आहे. आमचा महायुतीचा उमेदवार जाहीर होईल, तेव्हा पूर्ण ताकद लावणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठीच काम करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here