Radhakrishna Vikhe Patil : नगर शहरात पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्याची घटना गंभीर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर शहरात पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्याची घटना गंभीर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर : रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा ध्वज (Palestine flag) फडकवण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी (Police) शोधून काढण्याची आवश्यकता आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.

अवश्य वाचा : मूठभर लोकांनी स्वत:च्या फायद्याकरिता काँग्रेस पक्ष गहाण ठेवला; मंत्री विखे पाटलांचा गंभीर आराेप

घटनेचा तीव्र शब्दात निषेध

मंत्री ‍विखे पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्ह्यात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना काही अपप्रवृत्तीनी गालबोट लावण्याच्या हेतूने प्रार्थनेच्या दरम्यान पॅलेस्टाईनचा ध्वज फडकविला. ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल केला असला तरी, या घटनेमागील खरे सुत्राधार शोधून काढणे अतिशय गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले. या गंभीर घटनेच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा न करता पोलीस प्रशासनाने कसून चौकशी करावी. कारण अशी देशद्रोही वृत्ती कार्यरत असेल तर, प्रशासनाने ती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे, अशा देशद्रोही वृत्तीला कोणीही आश्रय देण्याची चूक करु नये, असे आवाहन मंत्री विखेंनी केले आहे.

palestine flag
palestine flag

हे देखील वाचा: भगवान महावीर जयंती मिरवणुकीत सर्वांनी शिस्त पाळावी : आदर्श ऋषीजी म.सा.

काेतवाली पाेलिसांची कारवाई (Radhakrishna Vikhe Patil)

नगर शहरातील ईदगाह मैदानावर बुधवारी (ता. १०) दुपारी दोन वाजता एका व्यक्तीने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविला. त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या शिवाय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथेही एकाने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविला होता. त्याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here