Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली अजित पवारांची तक्रार

Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली अजित पवारांची तक्रार

0
Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली अजित पवारांची तक्रार
Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली अजित पवारांची तक्रार

Eknath Shinde : अहिल्यानगर : अजित पवार (Ajit Pawar) आमच्या विकास कामांवर खोडा घालत आहेत, असं म्हणत शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर अजित पवारांबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत मंत्र्यांनी अजित पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केलीये. अजित पवार निधी देत नाहीत, विकासकामांमध्ये अडथळे आणतात, अशा तक्रारी मंत्र्यांकडून शिंदेंकडे करण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल सेनेच्या सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

नक्की वाचा : मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होणार?

शिवसेना – राष्ट्रवादीकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावेळी सेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवारांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत वाद सुरु असताना आता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची तक्रार केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : ‘गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल’;संजय राऊतांची टीका

आम्हाला पैसे देणार नसतील तर काम कसं करणार? (Eknath Shinde)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्व बैठक घेतली आहे. ही बैठक स्वतंत्रपणे करण्यात आली असून यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत ‘वन टू वन’ चर्चा केली. मात्र, प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. अजित पवार अर्थमंत्री आहेत, ते जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार? अशी चिंता देखील यावेळी शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदेंचे सगळे नेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत चर्चा झालीये.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला प्रत्येक खात्याचा आढावा
खात्याचे काम कसे सुरू आहे? किती कामे केली किती करायची आहेत? निधी संदर्भात काही अडचणी आहेत का? इतर कोणती अडचण आहे का? भविष्यात तुमच्या खात्यामधून कोणते महत्वाचे काम हाती घेणार? अशा सर्व बाबींची माहिती एकनाथ शिंदे यांनी घेतली. लोकोपयोगी कामांवर भर द्या, लवकरात लवकर कामे पूर्ण करा, फाइल पेंडिंग ठेऊ नका, सामान्य लोकांपर्यंत पोहोचा असा सल्ला देखील शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला.