BJP : नगर : नगरहून पुण्याला (Nagar-Pune) जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. मात्र, विनाथांबा बस (ST Bus) नसल्याने या प्रवाशांचा खोळंबा होत असून नाईलाजाने त्यांना खासगी वाहनाने जावे लागते. त्यामुळे प्रवाशांची लूट होत आहे, असे भाजप (BJP) शहर जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी (Sachin Parakhi) यांनी विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांना निदर्शनास आणून दिले.
नक्की वाचा : मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होणार?
बस बंद का? केल्याचा विचारला जाब
गेल्या अनेक महिन्यांपासून नगर-पुणे विना थांबा व विना वाहक एसटी बस बंद आहे. या मागणीसाठी शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात आंदोलन केले होते. त्यावेळी फक्त काही दिवस बस सुरु करणात आली होती. आज पहाटे शहर जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी यांनी बसस्थानकात जाऊन प्रवाश्यांकडे चौकशी केली असता पुण्यला जाणारी विना थांबा बस पुन्हा बंद झाल्याचे त्यांना कळले. त्यांनतर पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना चांगलेच धारेवर धरत बस बंद का? केल्याचा जाब विचारला.
अवश्य वाचा : ‘गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल’;संजय राऊतांची टीका
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी प्रशांत मुथा, सावेडी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, मध्य मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, केडगाव मंडल अध्यक्ष भरत ठुबे, कालिंदी केसकर, श्वेता झोंड, ज्योती दांडगे, रेणुका करंदीकर, बाळासाहेब गायकवाड, नितीन शेलार, अनिल निकम, राजू मंगलारप, सुनील सकट, ज्ञानेश्वर धिरडे, राजेंद्र फुलारे, सुजय मोहिते, कैलास गर्जे, बंटी डापसे, अभिषेक दायमा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.