Eknath Shinde : उपसमितीला ११,५३० कुणबी नोंदी सापडल्या; उद्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार : मुख्यमंत्र्यांची माहिती

0

नगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात उपसमितीची आज सकाळी बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली. यासंदर्भात न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं त्यांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या तपासणीत ११,५३० जुन्या कुणबी असलेल्या नोंदी सापडल्या आहे. त्यावर उद्या कॅबिनेटच्या बैठकीत (Cabinet meeting) निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयाेजित पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील वाचा : विश्वचषकात भारताचा वारू सुसाट 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”मूळ मराठा आक्षणावर सरकार काम सुरू आहे. सुप्रीम काेर्टात  ११ हजार ५३० कुणबी नाेंदी आढळल्या आहे. आरक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी समितीचे काम सुरू आहे. शिंदे समितीने आज पहिला अहवाल सादर केला. क्युरेटिव्ह पिटीशनसाठी तीन निवृत्त अधिकारी नेमण्यात आले आहे.  शिंदे समितीकडून १ काेटी ७३ लाख कागदपत्रांची तपासणी केली आहे.  मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.  मनाेज जरांगे यांच्या समितीशी उपसमिती चर्चा करेल. मराठा आरक्षणाचा मुद्धा १९८० पासून सुरू आहे. मागील आरक्षणात ५८ मार्चे शिस्तबद्ध निघाले हाेते.  कुणीही आत्महत्या करू नये.  मराठा बांधवानी टाेकाचे पाऊल उचलू नका, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. 

मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण देणार आहे. सरकारला थाेडा वेळ दिला पाहिजे.  मनाेज जरांगे यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजासाठी जरांगे यांनी लढा उभारला आहे. आम्ही कुणालाही फसवणार नाही. आंदाेलनाला गालबाेट लागू नये. सरकारला थाेडा अवधी वाढवून द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला आहे. राज्यभर पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी टिकणारं आरक्षण देण्यासाठी थाेडा कालावधी वाढवून द्यावा, मराठा आंदाेलकांनी शांततेची भूमिका घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आता यावर मनाेज जरांगे पाटील काय भूमिका घेणार आहे. याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here