Election Commission : अबब! ईव्हीएम गेलं चोरी; निवडणूक आयोगाने तहसीलदारांसह ‘या’ अधिकाऱ्यांना केले निलंबित

Election Commission

0
Election Commission
Counting of Votes

Election Commission : नगर : सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील तहसीलदार कार्यालयातून चोरीला (Theft) गेलेल्या ईव्हीएम मशीन (EVM machine) चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा (Election Commission) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पुरंदर तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा: ‘लाेकसभे’ला लाेकांची पसंती कुणाला; सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समाेर

दोन आरोपींना अटक, तीन अधिकारी निलंबित (Election Commission)

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. या ईव्हीएम चोरी प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांला  निलंबित करण्यात आलं आहे. सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता  राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुरंदरच्या प्रांताधिकारी वैशाली लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्ड यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

हे देखील वाचा: मुंबई काँग्रेसला धक्का;बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम

चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू (Election Commission)

सासवड येथील तहसील कार्यालयातील स्ट्रॉग रूममध्ये जनजागृतीसाठी ठेवलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे सोमवारी (ता. ५) उघड झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी २४ तासांत २ चोरांना या प्रकरणी अटक केली, पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटने जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे आणि या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.

Election Commission

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here