Festival : जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी

Festival : जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सवची जय्यत तयारी

0
Festival : जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सवची जय्यत तयारी
Festival : जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सवची जय्यत तयारी

Festival : संगमनेर : थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (Bhausaheb Thorat) व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे (Annasaheb Shinde) यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री नामदार सिद्धरामय्या (siddaramaiah) यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.७) पुरस्कार वितरण व पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव (Festival) समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

Festival : जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सवची जय्यत तयारी
Festival : जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सवची जय्यत तयारी


जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रशस्त बैठक व्यवस्था, साठ फूट बाय साठ फूट चे भव्य स्टेज, जर्मन हँगर मंडप, साऊंड सिस्टिम, एलईडी व्यवस्था, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ,प्रशस्त पार्किंग यांसह अद्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होणाऱ्या जावेद आली यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट साठी सर्व तयारी सुरू आहे.

हे देखील वाचा : डिजेने तिघांना चिरडले; दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जयंती महोत्सव संस्कृतीक कार्यक्रम असतो. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अत्यंत दर्जेदार व संस्मरणीय कार्यक्रम होत असून याही वर्षी जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुरस्कार वितरणासह स्थानिक कलाकारांचा आनंद सोहळा हा विविध गुणदर्शन कार्यक्रम आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर तर जावेद अली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.

नक्की वाचा : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; शरद पवारांची सडकून टीका

या कार्यक्रमाच्या वेळी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांसह गायक उपस्थित राहणार आहेत. तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आमदार उल्हास पवार, जळगावचे जैन उद्योग समूह व कोल्हापूरचे आमदार पी एन पाटील यांना गौरवण्यात येणार आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे निरीक्षक रमेश चेन्नथला, एच.के. पाटील, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते आमदार भास्करराव जाधव, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here