Firing : श्रीरामपूर : लोणीच्या बाजारातून ममदापूर येथे कत्तलीसाठी जनावरे आल्याची माहिती मिळाल्याने ते ठिकाण दाखवायला गेलेल्यांवर जमावाने तलवारी व कोयत्याने हल्ला (Attack) चढवल्याची घटना ममदापूर येथे घडली. यावेळी एका आरोपीने बंदुकीतून गोळीबारही (Firing) केला. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात
याबाबत पोलीस ठाण्यात आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (रा. तांदुळनेर, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपण प्राणी कल्याण समिती या संस्थेत काम करतो. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ला लोणीच्या बाजारातून काही कसाई लोकांनी जनावरं खरेदी करून ते ममदापूर
येथे नेवून कत्तल करणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली. आपण पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी पोलीस हवालदार इरफान शेख, अशोक शिंदे, शाम जाधव यांचे पथक पाठवले.
नक्की वाचा : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू
सदर कत्तलीचे ठिकाण दाखवण्यासाठी गोरक्षक दलाचे ईश्वर ज्ञानदेव टिळेकर, साईराज सोपान बेंद्रे असे आम्ही खासगी वाहनाने ६ वाजता ममदापूर गावात गेलो. त्याठिकाणी काही लोकांनी गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे दिसले. तर बाजूला हौदात मांसांचे तुकडे, हाडे पडलेली दिसली व दोन गोवंश जनावरांची कत्तल केलेली दिसली. आम्ही सदर जनावरे तेथून सोडत असताना तेथे जमलेल्या दहा ते बारा लोकांनी अचानकपणे आमच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातातील कोयते, तलवारी, काठ्या घेवून ते आमच्या अंगावर धावले व मारहाण करायला सुरूवात केली. याठिकाणी जमाव उग्र झाल्याने आमच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी आम्हाला तेथून बाहेर काढले. आम्ही तेथून जात असताना या लोकांपैकी एकाने माझ्या दिशेने बंदुकीतून गोळीबार केला. त्यामुळे आम्ही आजुबाजूच्या शेतात लपून बसलो. सदर लोकांनी आमची खासगी वाहने, मोटारसायकल तोडून, फोडून त्यांचे नुकसान केले. तसेच या घटनेत आपले पाकीट व ईश्वर टिळेकर याची चैन, हातातील ब्रासलेट कोठेतरी पडले.
त्यानंतर पोलिसांनी शेतात येवून आम्हाला त्या ठिकाणाहून बाहेर काढल्याचे नाईकवाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, नजीम कुरेशी, साजीद कुरेशी, वसीम कुरेशी, समीर कुरेशी, अजीम शहा, शाकीर शहा, जतीक कुरेशी, मुनीर कुरेशी, इम्रान अब्दुल हक शेख, अन्सार इब्राहीम शेख, नाजीन फकीर महंमद शेख, मुदतसर यासीन शेख, हुसेन फकीर महंमद शेख सर्व (रा. ममदापूर, ता. राहाता) यांच्याविरूद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.