Shrirampur news: श्रीरामपूर नगरपालिकेने शास्ती माफीचा निर्णय त्वरित घेण्याची मागणी 

श्रीरामपूर नगरपालिकेने देखील घरपट्टीवरील शास्ती माफीचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी सावरकर प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

0
नगरपालिकेने शास्ती माफीचा निर्णय त्वरित घेण्याची मागणी

श्रीरामपूर : अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipality) हद्दीतील मालमत्ता धारकांच्या थकीत घरपट्टीवरील शास्तीमध्ये (Punishment) (दंड) ७५ टक्के माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाप्रमाणे श्रीरामपूर नगरपालिकेने (Shrirampur Municipality) देखील घरपट्टीवरील शास्ती माफीचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी सावरकर प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी उपविभागीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

नक्की वाचा : पाेलीस पाटील पदभरतीसाठी ईश्वरी चिठ्ठीने आरक्षण साेडत    

पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मुथा यांनी म्हटले आहे की, राज्यातील सर्वच महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांच्या थकीत घरपट्टीवर महिन्याला दोन टक्के म्हणजे वर्षाला चोवीस टक्के व्याज आकारण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे. घरपट्टी भरण्याची मानसिकता मालमत्ता धारकांची असते. मात्र थकीत घरपट्टी बिलांमध्ये ७५ टक्के शास्ती (दंड) म्हणजेच व्याज आकारण्यात येत असल्याने घरपट्टी अनेकजण भरत नाहीत. याचा फटका पालिकेलाच बसतो.

अवश्य वाचा : घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड

वसुलीसाठी मालमत्ता धारकांच्या दारोदारी कर्मचाऱ्यांना फिरावे लागते.तर काही ठिकाणी त्यांना वादालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे इतर वसुलीवरही त्याचा परिणाम होतो. थकबाकीदारांची  नावे भरचौकात बॅनरवर झळकवण्याचा खर्चही पाकिकेला सोसावा लागतो. पालिकेच्या या अफलातून कपनेमुळे वसुली किती झाली, ते मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी पालिकेने जीवाचा आटापिटा करण्यापेक्षा घरपट्टीवर लादण्यात आलेली वाढीव ७५ टक्के शास्ती म्हणजेच व्याज सरसकट माफ केल्यास पालिकेची वसुली खूप मोठ्या प्रमाणात होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारक स्वयंस्फूर्तीने घरपट्टी भरण्यास पालिकेत गर्दी करतील.

याबाबत मुथा यांनी पूढे म्हटले आहे की, मागील वर्षी पालिकेची १४ कोटी ३९ लाख रुपयाएवढी थकबाकी थकलेली आहे. आता चालू आर्थिक वर्षात शास्तीमुळे पुन्हा त्यामध्ये वाढ होणार आहे. शासनाच्या थकीत घरपट्टीवरील वार्षिक २४ टक्के व्याजाच्या विरोधात मुथा यांनी गांधी पुतळ्यासमोर उपोषण देखील केले होते. शासकीय नियमाप्रमाणे थकीत घरपट्टीवर लादण्यात आलेल्या शास्तीची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याने घरपट्टी थकीतांच्या रकमेचा आकडा वाढत चालला आहे.

त्यामुळे श्रीरामपूर पालिकेने अहमदनगर महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे थकीत घरपट्टी वरील शास्ती ७५ टक्के कमी करावा,अशी मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे. या निवेदनावर जगदीश थेटे,योगेश ओझा, विनोद बठेजा,अनिल बचाटे, राजू कुलथे,जितेंद्र कासलीवाल,महावीर पाटणी, राजेंद्र कोठारी या मालमत्ता धारकांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here