ST Bus : संजीवन समाधी साेहळा; आळंदी यात्रेसाठी ‘लालपरी’ हाऊसफुल्ल

ST Bus : संजीवन समाधी साेहळा; आळंदी यात्रेसाठी 'लालपरी' हाऊसफुल्ल

0
ST Bus : संजीवन समाधी साेहळा; आळंदी यात्रेसाठी 'लालपरी' हाऊसफुल्ल
ST Bus : संजीवन समाधी साेहळा; आळंदी यात्रेसाठी 'लालपरी' हाऊसफुल्ल

ST Bus : नगर : तीर्थक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Shree Sant Dnyaneshwar Maharaj) यांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा (Sanjivan Samadhi Ceremony) साजरा होत आहे. ९ डिसेंबरला कार्तिकी एकादशी आळंदी यात्रा, तर ११ डिसेंबरला माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. यापार्श्वभूमीवर नगर शहरातील एसटी बसस्थानकात (ST Bus) आज प्रवाशांची उच्चांकी गर्दी पहायला मिळाली.

नक्की वाचा : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू

आळंदी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून आज (ता. ८) ते १३ डिसेंबर नगर विभागातून ११८ जादा गाड्यांचे नियाेजन केले आहे. नगर जिल्ह्यात अकरा आगार असून प्रत्येक आगारातून साधारणतः १० ते १२ जादा बसेसचे नियाेजन आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. परंतु, यंदा यात्रेसाठी आळंदीला जाण्यासाठी बसस्थानकावर वारकऱ्यांची उच्चांकी गर्दी झाली हाेती. जादा वाहतुकीचे नियाेजन असतानाही अपेक्षापेक्षाही अधिक गर्दी झाल्याचे चित्र नगरच्या स्वस्तिक बसस्थानकावर आज दिसून आले. बसस्थानकात सकाळपासूनच बहुतांश प्रवाशी ताटकळलेले दिसत हाेते.

हे देखील वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात

दरम्यान, एकादशी असली की आठवतात ते वारकरी आणि त्यांची पायी होणारी वारी. विठ्ठलाच्या चरणी माथा टेकायला वारकरी पायी पोहोचतात. आषाढी, कार्तिकी एकादशीला मोठा उत्सव बघायला मिळतो आणि या निमित्त यात्रा भरते. जशी पंढरपूर यात्रा प्रसिद्ध आहे तशीच आळंदी यात्रा देखील. या निमित्त होणारा उत्सवही मोठ्या भक्तिभावाने पार पडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here