Blocked the way : संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक मार्ग अडवला

blocked the way : संगमनेर : येथील बाजार समितीमध्ये (Market Committee) कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद (Onion auction closed) पाडला.

0
Blocked the way : संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक मार्ग अडवला
Blocked the way : संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक मार्ग अडवला

blocked the way : संगमनेर : येथील बाजार समितीमध्ये (Market Committee) कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद (Onion auction closed) पाडला. तसेच बाजार समितीच्या बाहेर रास्ता रोको (Blocked the way) आंदोलन केले. तब्बल दोन तास सुरू असलेले आंदोलन सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी कांद्याचा फेर लिलाव करणार असल्याची घोषणा केल्यानंतर मागे घेण्यात आले. 

नक्की वाचा : गोवंश रक्षकांवर जमावाचा गोळीबार

संगमनेर तालुक्यातील अनेक गावातून शेतकरी आपला कांदा घेऊन संगमनेर बाजार समितीमध्ये आले होते. सकाळपासून आलेल्या शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांना म्हणावा तसा भाव मिळालेला नाही. नाफेडच्या दरानुसार देखील भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी आज मोठ्या आशेने बाजार गाठला होता. पण, त्यांच्या पदरी निराशा पडल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळाला नाही. संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठातील कांदा लिलाव बंद पाडला. तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होत बाजार समितीच्या आवारात ठिय्या देत “कांद्याला योग्य भाव द्यावा”, “सरकारचा निषेध असो”, आशा घोषणा देत शहरातून गेलेला पुणे – नाशिक मार्ग अडवला. यावेळी या मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी फेरलिलाव करणार असल्याची घोषणा केल्यानंतर हे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

हे देखील वाचा : संजीवन समाधी साेहळा; आळंदी यात्रेसाठी ‘लालपरी’ हाऊसफुल्ल


कांदा लिलावाच्या दिवशी बाजार समितीसमोर आंदोलन झाले. या आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या तीन तास रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यांनी आंदोलकांना समजावून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. फेरलिलाव होणार असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here