Robbery : शेवगाव तालुक्यात दरोडा घालणाऱ्या पाच आरोपींना अटक

पाचही आरोपी नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) बाहेरचे आहेत

0

Robbery | नगर : शेवगाव तालुक्यातील चापडगाव व आखेगाव येथे सशस्त्र दरोडा (Robbery) घालणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (ता. २५) जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पाचही आरोपी नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) बाहेरचे आहेत.

हे पहा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू

दीपक गौतम पवार (वय ३५, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), नितीन मिसऱ्या चव्हाण (वय २०, रा. जोड मालेगाव, ता. गेवराई, जि. बीड), गोविंद गौतम पवार (वय २०, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), किशोर दस्तगीर पवार (वय १९, रा. हिरडपुरी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) व राजेश दिलीप भोसले (वय ३०, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. त्यांचे आणखी पाच साथीदार पसार आहेत. त्यांचा शोध पथकाकडून सुरू आहे. २१ डिसेंबरला रात्री चापडगाव येथे कमलेश वाल्हेकर यांच्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटारसायकल, टी.व्ही., गॅस शेगडी, सहा शेळ्या असा एक लाख आठ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी नेला होता. तर त्याच रात्री आखेगाव येथे अभय पायघन यांच्या घरामध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करून मंगल पायघन व रामकिसन काटे यांना मारहाण करत ५० हजार रुपये घेऊन पसार झाले. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचा : Cricket : एस.के. क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट अकॅडमी ठरली अजिंक्य

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच काही माहिती मिळवली. पोलीस निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा दीपक पवार व त्यांच्या साथीदारांनी केला आहे. ते टाकळीअंबड येथील त्यांच्या घरासमोर बसलेले आहेत. त्यानुसार पथकाने धाड टाकून पाच आरोपींना जेरबंद केले. जेरबंद आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी हा गुन्हा आणखी पाच आरोपी सोन्या मजल्या भोसले (रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), उद्या मजल्या भोसले, संभाजी गौतम पवार (दोघे रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), अभिषेक भैया चव्हाण (रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) व संभाजी गौतम पवार यांच्या मदतीने केल्याचे पथकाला सांगितले. हे पाच आरोपी पसार असून त्यांचा शोध सध्या पथकाकडून सुरू आहे. 

अवश्य वाचा : Leopard : विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; निसर्गाच्या अधिवासात साेडले

जेरबंद आरोपींकडून मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा दोन लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जेरबंद पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी दीपक पवारवर नऊ गुन्हे, नितीन चव्हाणवर चार, गोविंद पवारवर दोन, किशोर पवारवर दोन, राजेश भोसलेवर एक गुन्हा दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here