Fog : अकोले : तालुक्याच्या आदिवासी भागात गारपिटीच्या पावसाने अपरिमित हानी झाली आहे. तर इतर भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हाहाकार उडवून दिला. यातून शेतकरी सावरत असताना तीन दिवसांपासून दररोज सकाळी पडणार्या धुक्याने (Fog) पिकांवर रोगांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय दूषित वातावरणामुळे (Contaminated environment) नागरिक आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
हे देखील वाचा: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात
सध्या शेतात असलेले कांदा, गहू, हरबरा, ज्वारी ही पिके तर डाळींब, द्राक्ष व इतर फळबागा जगविण्यासाठी खर्चिक असलेल्या रासायनिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गारपिटीचा पाऊस व आता पडत असलेल्या धुक्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. राज्य शासनाने गारपीटग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले; परंतु त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे, तलाठी व मंडलाधिकारी पंचनामे इतर कागदपत्रे सादर करणे अशा किचकट प्रक्रियाने ‘भिक नको, पण कुत्रं’ आवर अशी म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
नक्की वाचा : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू
मागील वर्षीच्या पावसाने झालेली नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकर्यांना मिळालेली नसताना, आता तरी मिळेल का? असा प्रश्न शेतकर्यांमधून विचारला जात आहे. सध्या पडत असलेल्या धुक्याने पहाटेचे अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या धुके व दवबिंदूमुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.