Sujay Vikhe Patil : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board) समावेश नगर महापालिकेत व्हावा, याबाबतची मागणी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.

0
Sujay Vikhe Patil : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू
Sujay Vikhe Patil : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू

Sujay Vikhe : नगर : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा (Bhingar Cantonment Board) समावेश नगर महापालिकेत व्हावा, याबाबतची मागणी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. भिंगारमधील नागरिकांना मोठ्या समस्येने सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून भिंगारकरांची मागणी आहे की, नगर महापालिकेत (Municipal Corporation) भिंगारचा समावेश करावा. याबाबत संरक्षणमंत्री यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करता भिंगार कॅन्टोन्मेंटला येत्या तीन महिन्यांत नगर महापालिकेत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी खासदार विखे यांनी केली.

नक्की वाचा : देशरक्षण हेच एकमेव लक्ष्य; अण्णा हजारे

संसदेत बोलताना विखे म्हणाले, ”माझ्या लोकसभा मतदार संघामध्ये भिंगार छावणी परिषदेची १८७९ मध्ये स्थापना झाली. आजवर २५ हजार लोक याठिकाणी वास्तव्यास आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट भाग हा लष्कराच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बांधकाम असो, नागरी समस्या असो, अशा अनेक अडचणी नागरिकांना येत आहे. यामुळे भिंगारचा समावेश नगर महापालिकेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांची आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी एक महत्वाची बैठक पार पडली आहे. तसेच भिंगारचे नागरिक यांचे मत जाणून घेण्यासाठी एक नगरमध्ये बैठक देखील पार पडली. यामध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असून येत्या काळात लवकरात लवकर भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश नगर महापालिकेत करण्यात यावा, अशी मागणी यावेळी खासदार विखे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात

दरम्यान, सुमारे १८७९ मध्ये स्थापन झालेल्या भिंगार छावणी परिषदेचे लष्करी क्षेत्र वगळून, नागरी क्षेत्र हे नगर महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी सध्या भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप हे चांगलेच आग्रही आहे. यातच येत्या चार महिन्यांत याबाबतचा निर्णय होईल, अशी ग्वाही देखील खासदार विखेंनी भिंगारकरांना दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here