IFFI 2023 Goa : ‘गोवा’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बटरफ्लाय’ची निवड

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बटरफ्लाय' हा सिनेमा येत्या बुधवारी (ता. २२) नोव्हेंबरला दाखविण्यात येणार आहे. त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी मंगळवार (ता. २१) नोव्हेंबरला रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे.

0
'गोवा' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बटरफ्लाय'ची निवड

नगर : बहुप्रतीक्षित ‘इफ्फी’ (IFFI) या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (International Festival Of India) आज (ता. २०) सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे या महोत्सवात महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar) अभिनय असलेला आणि मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ (Butterfly) या सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.

नक्की वाचा : शिक्षकांचा वंचिताची दिवाळी उपक्रम प्रेरणादायी – अण्णा हजारे 

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बटरफ्लाय’ हा सिनेमा येत्या बुधवारी (ता. २२) नोव्हेंबरला दाखविण्यात येणार आहे. त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी मंगळवार (ता. २१) नोव्हेंबरला रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आणि फिल्म बाजार या दोन्ही ठिकाणी  दाखवला जाणारा हा एकमेव मराठी चित्रपट असेल. या महोत्सवात एखाद्या मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग होणं ही मोठी गौरवाची बाब आहे.

अवश्य वाचा : ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता

गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाजार’ या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव,  गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट या महोत्सवासाठी निवडण्यात आले आहेत.

‘बटरफ्लाय’च्या विशेष स्क्रीनिंग दरम्यान या सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते अभिजीत साटम, चित्रपटाची निर्माती आणि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, दिग्दर्शिका मीरा वेलणकर आणि ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here