Godhra Teaser:’गोध्रा’चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट

आता २२ वर्षांनंतर गुजरात दंगल म्हणजेच गोध्रा हत्याकांड आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लवकरच 'एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

0
Godhra teaser out

नगर : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीने म्हणजे गोध्रा हत्याकांडाने(Gondhra massacre) संपूर्ण देश हादरला होता.आता २२ वर्षांनंतर गुजरात दंगल म्हणजेच गोध्रा हत्याकांड आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लवकरच ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर (teaser) आज लाँच करण्यात आला आहे.

नक्की वाचा : कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा 

अभिनेता रणवीर शौरी व मनोज जोशी यांची चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका (Godhra Teaser)

 अभिनेता रणवीर शौरी आणि मनोज जोशी यांनी या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.’एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच निर्मात्यांनी लाँच केला. अभिनेता रणवीर शौरीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. त्याने टीझर शेअर करत लिहिले की, #GodharaTeaser हे सर्व तुमचे आहे. हा अपघात किंवा षडयंत्र असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, असं आवाहन त्यांनी केले आहे.

अवश्य वाचा : ‘आता वेळ झाली’ चित्रपटाची घोषणा ; दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत  

गोध्रामध्ये घडलेल्या या दुःखद घटनेची खरी कहाणी ‘गोध्रा’त (Godhra Teaser)

गुजरातच्या गोध्रामध्ये घडलेल्या या दुःखद घटनेची खरी कहाणी आपल्याला ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात, रणवीर शौरीने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. जो गोध्रा ट्रेन आगीत पीडितांच्या बाजूने लढताना दिसतो. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन एमके शिवाक्ष यांनी केले आहे. ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ हा चित्रपट पीडितांच्या न्यायासाठी लढण्याचा प्रवास दाखवतो.  सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या टीझर व्हायरल होत आहे. हा चित्रपट येत्या १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here