नगर : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण युवा सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याने सरावाला (Practice) सुरुवात केली आहे. शुभमन गिल बुधवारी (ता. १२) अहमदाबादमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने आज (ता.१३)सरावाला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या सामन्याआधी शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचे समोर आलं होतं. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले. भारतीय संघ दिल्लीवरुन अहमदाबादमध्ये आज दाखल होणार आहे.
दिल्लीमध्ये भारतीय संघ अफगाणिस्तानविरोधात दोन हात करत होता, तेव्हा शुभमन गिल डेंग्यूचा सामना करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिल याची प्रकृती सुधारली आहे. चेन्नईतून अहमदाबादला दाखल झाल्यानंतर गिल याने सरावाला सुरुवात केली आहे. शनिवारी (ता.१४) ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे. त्यासाठी गिल याने तयारी सुरुवात केली आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम शुभमन गिलवर लक्ष ठेवून आहे.
आता पाकिस्तानविरोधात शुभमन गिल मैदानावत उतरणार का ? याकडे सर्वच भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. वर्षभरापासून शुभमन गिल यांची खेळी प्रेक्षकांना भावत आहे. गिलची अनुपस्थिती भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरोधात प्रकर्षाने जाणवली आहे. त्यामुळे गिलच्या कमबॅककडे सर्वच क्रीडाप्रेमी नजरा लावून बसले आहेत. शुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात परतल्यास भारतासाठी तो मोठा प्लस पॉइंट सिद्ध होणार आहे.