attack : दोन बिबट्यांच्या हल्ल्यात तरुण जखमी

A shocking incident of two leopards attacking a youth has taken place in the Wadala Mahadev area of the taluka last night (11).

0
249

श्रीरामपूर: तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात काल (ता.११) रात्री युवकावर दोन बिबट्यांनी (Leopard) हल्ला (attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेत हा युवक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शहरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले आहे.


वडाळा महादेव परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय रोडवर राहणारा दीपक एकनाथ शिंदे (वय ३२) हा तरुण काल रात्री ८ वाजेच्या सुमारास दूध घालून घरी परतत असताना वस्तीजवळच दोन बिबट्यांनी त्याच्यावर एकाचवेळी हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्याने दीपक शिंदे हा तरुण गाडीवरून खाली पडला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याच्या गुडघ्याला व पायाला जखम झाली आहे. अचानकपणे बिबट्याचा हल्ला झाल्याने तरुणाला काय करावे हे समजले नाही.

घाबरलेल्या अवस्थेत त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे वस्तीवरील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्याला तात्काळ श्रीरामपुरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बिबट्यांच्या हल्ल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात त्वरित पिंजरा लावावा,अशी मागणी या परिसरातिल नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here