नगर : सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचे युग आहे. या इंटरनेट (Internet) आणि सोशल मीडियाचे (Social Media) जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. इंटरनेटद्वारे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत चाललं आहे. हीच बाब लक्षात घेऊन भारत सरकारने सायबर क्राईम (Cyber Crime) आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरु केलं आहे. “चक्षु” (Chakshu Online Portal) असं या पोर्टलचं नाव आहे. या प्लॅटफॉर्मवर, भारतातील सर्व नागरिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकतात.
नक्की वाचा : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ३ माजी आमदार भाजपात
ऑनलाईन घोटाळ्यांना बसणार आळा (Chakshu Online Portal )
“चक्षु” हे पोर्टल स्थापन करण्यामागचा उद्देश म्हणजे सोशल मीडियावर पसरवले जाणारे खोटे आणि फसवे संदेश रोखणे हा आहे. भारत सरकारच्या चक्षू या नवीन ऑनलाईन पोर्टलद्वारे भारतातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीबाबत किंवा फसवणुकीसाठी आलेले संदेश किंवा कॉल याबाबत थेट सरकारकडे तक्रार करू शकणार आहे. सरकार या सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवेल. तसेच, फसवणूक करणाऱ्यांवर पुरेशी कारवाई देखील करणार आहे. ज्यामुळे देशात ऑनलाईन माध्यमातून होणारे घोटाळे कमी करता येतील.
चक्षु पोर्टलमध्ये नेमके काय आहे ? (Chakshu Online Portal )
चक्षु प्लॅटफॉर्मसह, भारतीय नागरिकांना सायबर गुन्हे, पैशांशी संबंधित फसवणूक, कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेले संदेश याची तक्रार करण्याची सुविधा मिळते. संशयास्पद किंवा फसव्या काही उदाहरणांमध्ये बँक खाते, पेमेंट वॉलेट, सिम, गॅस कनेक्शन, वीज कनेक्शन, केवायसी अपडेट, एक्सपायरी, निष्क्रिय करणे आदींचा यात समावेश आहे.
कोणत्या गोष्टींची तक्रार करू शकता ? (Chakshu Online Portal )
भारत सरकारचे हे पोर्टल, दूरसंचार विभागाद्वारे संचालित अधिकृत संचार साथी वेबसाईटवर उपलब्ध आहे. व्हॉट्सॲप, एसएमएस आणि कॉल्सवरील बनावट संदेशांमुळे होणारी सायबर फसवणूक लक्षात घेऊन हे पोर्टल तयार करण्यात आलं आहे. चक्षु पोर्टलद्वारे, लोक आर्थिक घोटाळे, बनावट ग्राहक समर्थन, बनावट सरकारी अधिकारी, बनावट नोकऱ्या आणि कर्ज ऑफर अशी तोतयागिरी करणारे कॉल संदेश पाठवणारे लोक सर्व प्रकारच्या घोटाळ्यांना सामोरे जात आहेत. तुम्ही संशयास्पद कॉल, संदेश किंवा संभाषणाची तक्रार करू शकता. चक्षु पोर्टलवर फसवणुकीची तक्रार आल्यास पोलीस, बँका आणि इतर तपास यंत्रणा सक्रिय होतील. तक्रार केल्यानंतर काही तासांत कारवाईही सुरू होऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि फसवणुकीशी संबंधित क्रमांक त्वरित ब्लॉक केला जाणार आहे.
अवश्य वाचा : मुकादमावर पूर्व वैमनस्यातून जीवघेणा हल्ला करणारे आरोपी जेरबंद