Guns And Gulaabs Sesson 2 :‘गन्स अँड गुलाब्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा ; राजकुमार दिसणार पाना टिपूच्या भूमिकेत

Guns And Gulaabs Sesson 2 : प्रसिद्ध दिग्दर्शक राज आणि डीके यांनी ‘गन्स अँड गुलाब्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.

0
Guns And Gulabs

नगर : बॉलिवूडचा चतुरस्त्र अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव आणि दुल्कर सलमान (Dulquer Salmaan) यांच्या क्राइम कॉमेडी वेब सीरिज ‘गन्स अँड गुलाब्स’ (Guns And Gulaabs) ने चांगलाच धुमाकूळ घातला होता. नेटफ्लिक्सची (Netflix) ही सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता त्याचा दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नक्की वाचा : नगर जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखविले जाणार : जिल्हाधिकारी सालीमठ

प्रसिद्ध दिग्दर्शक राज आणि डीके यांनी ‘गन्स अँड गुलाब्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. राजकुमार राव पुन्हा एकदा पाना टिपूच्या भूमिकेतून लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘गन्स अँड गुलाब्स २’च्या माध्यमातून राजकुमार राव, राज आणि डीके हे तिसऱ्यांदा एकत्र येणार आहे. राजकुमार रावने यापूर्वी स्पष्ट केले होते की, या दोन निर्माते आणि दिग्दर्शकांच्या जोडीबरोबर काम करणे त्याला प्रचंड आवडते कारण ते कायम हटके आणि ऑफबीट अशा गोष्टी लोकांसमोर घेऊन येतात.

अवश्य वाचा : भारतीय तरुणांचे सात ते आठ तास फेसबुक व इंस्टाग्रामवर : राहुल गांधी

‘गन्स अँड गुलाब्सच्या पहिल्या सीझनमधील पाना टिपूच्या मजेशीर भूमिकेसाठी राजकुमार रावला अनेक पुरस्कारही मिळाले. प्रेक्षकांना या सीरिजमध्ये कॉमेडी, अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलर सर्वकाही पाहायला मिळाले. या मालिकेची कथा ९० च्या दशकातील गुलाबगंज या काल्पनिक शहरातील गुन्हेगारी विश्वावर आधारित होती. आता या सीरिजच्या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

या सीरिजमध्ये राजकुमार रावसह गुलशन देवैया, दुल्कर सलमान, श्रेया धन्वंतरी, पूजा गोर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अजून या सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here