SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या परिक्षांसाठीही हॉल तिकीट महत्त्वाचं ठरणार आहे.

0
SSC Exam

नगर : राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची (SSC Exam) परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकीट (Hall Tickit) कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मात्र आता त्यांचा हा प्रश्न सुटला आहे. कारण विद्यार्थ्यांना उद्या म्हणजेच ३१ जानेवारी २०२४ पासून हॉल तिकीटं डाऊनलोड करता येणार आहे.

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या परिक्षांसाठीही हॉल तिकीट महत्त्वाचं ठरणार आहे. सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च २०२४ च्या परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीटं ऑनलाइन डाऊनलोड करता येतील. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

नक्की वाचा : साखर-डाळ वाटपावरून संजय राऊतांची टीका; भाजपकडून लाडू पाठवत प्रत्युत्तर

१० वीची परीक्षा कधी ? (SSC Exam)

बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार (SSC Exam)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना दोन्ही परीक्षांसाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या पेपरसाठी ३ तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ ३ तास १० मिनिटांचा असणार आहे.

परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावं लागेल,अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करुनच त्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे वेळेआधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहचावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही पहा : महाराष्ट्रात गारठा वाढणार; ‘या’ तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here