Hardik Pandya : मोठी बातमी ! हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर

भारतीय टीमचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे.

0
253

नगर : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय टीमने सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. मात्र असं असतानाच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय टीमचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वर्ल्डकपमधून (ICC World Cup 2023) बाहेर पडला आहे.

नक्की पहा :  ‘झिम्मा २’ मधील रिंकू राजगुरूच्या पात्राचे नाव आले समोर  

पुण्यात पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात  हार्दिकला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही पांड्यानं केवळ तीनच चेंडू टाकले होते. यानंतर टीम इंडियानं मागील तीन सामने त्याच्याशिवाय खेळले आहेत. हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तेव्हापासूनच हार्दिकचे चाहते त्याच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, आता चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. कारण हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नाही.

हेही पहा:  भंडारदरा धरणातील पाण्याचे रब्बीच्या आवर्तनाचे नियोजन जाहिर करावे’

मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे हार्दिक टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू असलेला हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी किती महत्त्वाचा आहे, हे केवळ देशानंच नाही तर संपूर्ण जगानं पाहिलं आहे. हार्दिक पांड्यानं अनेक मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळालं आहे.

प्रसिद्ध कृष्णानं टीम इंडियाकडून 17 वनडे खेळले असून या सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर 29 विकेट्स आहेत. 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून शेवटचा वनडे सामना खेळला होता. जिथे त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ ओव्हर्समध्ये 1/45 देऊन डेव्हिड वॉर्नरची मौल्यवान विकेट घेतली. याशिवाय कृष्णानं दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्यांच्या नावावर एकूण 4 विकेट आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा कर्नाटकातून खेळतो. त्यामुळे आता प्रसिद्ध कृष्णा पांड्याची कमी भरू शकेल का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.