Highway : नगर : पुणे-नगर (Pune-Nagar) आणि पुणे-नाशिक (Pune-Nashik) या दोन या महामार्गांच्या विस्तारासह येथे उन्नत मार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग (Highway) प्राधिकरणाने पाऊल पुढे टाकले आहे. पुणे-शिरूर दरम्यानचा सहापदरी महामार्ग (Six lane highway) आणि त्यावर सहा पदरी उड्डाणपूल तसेच नाशिक फाटा ते खेड दरम्यान दोन पदरी सेवा रस्त्यांसह आठ पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गांसाठी तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांना कांदा निर्यातबंदीचा घाव; तब्बल एक हजार कोटींचा फटका
या महामार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे या महामार्गांना समांतर असे उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच केली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील या दोन्ही महामार्गांच्या उन्नत मार्गांच्या बांधकामासाठीच्या निविदा एनएचएआयने प्रकाशित केल्या आहेत. पुणे-शिरूर मार्गासाठी साडेसात हजार कोटी रुपये, तर नाशिक फाटा-खेड मार्गासाठी सहा हजार तीनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत.
नक्की वाचा : दहावीच्या विद्यार्थ्याकडून सातवीच्या विद्यार्थिनीला गेले दिवस