Karjat | कर्जतच्या नगराध्यक्षपदी प्रा. राम शिंदे गटाच्या रोहिणी घुले बिनविरोध  

0
Karjat
Karjat

Karjat | कर्जत: येथील कर्जत (Karjat) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) गटाच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा शुक्रवारी (ता.२) करण्यात येईल. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) गटाकडून माजी नगराध्यक्षा प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी काल (ता.२८) आपला नगराध्यक्षा पदाचा अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी तो अर्ज माघारी घेतल्याने रोहिणी घुले यांची निवड निश्चित झाली आहे. अखेर सभापती राम शिंदेंनी कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या सत्तेस सुरुंग लावला हे स्पष्ट झाले.

नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार  

अध्यक्षपदासाठी दोन अर्ज होते (Karjat)

उषा अक्षय राऊत यांच्या राजीनाम्यानंतर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. सोमवारी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाकडून विद्यमान काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तर आमदार रोहित पवार यांच्याकडे अवघे चारच नगरसेवकांची संख्या असताना त्यांच्याकडून माजी नगराध्यक्षा प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. सोमवारीच प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी पार पाडली होती. त्यात रोहिणी घुले आणि प्रतिभा भैलुमे या दोघींचे नगराध्यक्षा पदाचे अर्ज वैध ठरले होते. 

अवश्य वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; ‘या’ मान्यवरांची वर्णी

प्रतिभा भैलुमेंची माघार (Karjat)

मंगळवारी(ता.२९) दुपारी ४ वाजेपर्यंत नगराध्यक्षा पदाची उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत होती. अखेर रोहित पवार गटाच्या प्रतिभा भैलुमे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची माहिती मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांनी दिली. त्यामुळे रोहिणी घुलेंचा बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांच्या एकहाती सत्तेस सुरुंग लावत बाहेर पडलेले सत्ताधारी ११ नगरसेवक आणि भाजपाचे २ अशा १३ नगरसेवकांची एकत्र मोट बांधली होती. तर रोहित पवार गटाकडे अवघे चारच नगरसेवक राहिल्याने कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तांतर अटळ होते. रोहिणी घुले यांची नगराध्यक्षा निवडीची प्रशासकीय अधिकृत घोषणा शुक्रवारी पीठासीन अधिकारी नितीन पाटील हे जाहीर करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here