Aatli Batmi Phutli Movie:’आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

0
Aatli Batmi Phutli Movie:'आतली बातमी फुटली' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
Aatli Batmi Phutli Movie:'आतली बातमी फुटली' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

नगर : मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. त्यातच वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ (Aatli Batmi Phutli) हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित (Teaser Release) झाला आहे. ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार   

चित्रपटाची कथा नेमकी काय ?(Aatli Batmi Phutli Movie)

‘आतली बातमी फुटली’ या सिनेमाची कथा एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट. चित्रपटाच्या टिझरमधून हे रहस्य,धमाल आणि चित्रविचत्र घटना यांची मजेशीर झलक पाहायला मिळत आहे. 

अवश्य वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; ‘या’ मान्यवरांची वर्णी  

चित्रपटात ‘हे’ कलाकार झळकणार (Aatli Batmi Phutli Movie)

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदी कलाकार आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे. हा कॉमेडी क्राइम सिनेमा धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘सरप्राईज’ करेल असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी.गांधी यांनी व्यक्त केला.

‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. फिल्मास्त्र स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली  आहे.