Smita Tambe :अभिनेत्री स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला ‘कासरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

अभिनेत्री स्मिता तांबेने आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी 'कासरा' या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

0
Smita Tambe
Smita Tambe

नगर : अभिनेत्री स्मिता तांबेने आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी “कासरा”(Kasara) या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात पार पडले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांची आवर्जून उपस्थित होती. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.      

नक्की वाचा : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल  

साई उत्सव फिल्म्सनं केली “कासरा” या चित्रपटाची निर्मिती (Smita Tambe)

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्सनं “कासरा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा, संवादलेखन केलं आहे तर अविनाश सातोसकर यांनी छायांकन केले आहे. प्रशांत नाकती यांनी लिहिलेल्या गीतांचे प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील ही गाणी गायक जावेद अली, आदर्श शिंदे , गायिका आर्या आंबेकर, सोनाली सोनवणे, मनीष राजगिरे, रविंद्र खोमणे आणि रिषभ साठे यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.  

अवश्य वाचा : अहमदनगर शहराच्या नामांतरणामुळे राहुरीत जल्लोष

या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह अभिनेते गणेश यादव, प्रकाश धोत्रे, राम पवार, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, देवेंद्र लुटे, विशाल अर्जुन आणि बाल कलाकार साई नागपूरे यांच्या मध्यवर्ती भूमिका असून जनमेजय तेलंग, तन्वी सावंत हे कलाकार या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. विष्णू खापरे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.            

स्मिता तांबे अभिनीत शेतीप्रधान विषयावरील “कासरा” हा चित्रपट (Smita Tambe)

स्मिता तांबेनं आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून सशक्त अभिनय केला आहे. त्याच पठडीत आता “कासरा” चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे. शेतीप्रधान विषयावरील “कासरा” हा चित्रपट अन्नदात्या शेतकऱ्याला वेगळा दृष्टिकोन देणारा आहे. शेतीतील प्रश्न मांडतानाच त्यावर उत्तर देण्याचाही प्रयत्न हा चित्रपट करतो. त्यामुळे स्मिता तांबेसारख्या दमदार अभिनेत्रीच्या अभिनयानं या चित्रपटाचं कथानक वेगळ्या उंचीवर गेलं आहे. कासरा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना ३ मे पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here